Dailyhunt
प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच.

प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच.

खनौ (उत्तर प्रदेश) : कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानंतर चार महिन्यातच पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याची घटना सोनभद्रमध्ये घडली आहे. पतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्षक पतीने 23 जानेवारीला काशी मोड भागातील ती शिकवत असलेल्या खासगी शाळेच्या बाहेर पत्नीला दुचाकीवरून सोडले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पत्नी न परतल्याने त्याने शाळेत चौकशी केली. यावेळी पत्नी शाळेत आलीच नाही अशी माहिती त्याला मिळाली. पतीने तिला शोधण्याच प्रयत्न केला आणि शेवटी पोलिसांत जाऊन पत्नी हरवल्याची तक्रार दिली. चार दिवसांनी त्याला पत्नीच्या मोबाईलवरून व्हॉट्सअप ऑडिओ मेसेज आला आणि तो रडू लागला. 'मला कुठेही शोधू नकोस. तुझ्याबरोबरची सगळी नाती मी तोडत आहे आणि आता मला नवा जोडीदार मिळाला आहे. मी कायमची त्याच्याबरोबरच राहीन,' असे पत्नीने ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले होते.

पतीने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोघांचं 2016 मध्ये कॉलेजपासून प्रेमसंबंध होते. लग्नाला दोघांच्या कुटुंबांचा विरोध होता. पण त्यांनी तो झुगारून 24 सप्टेंबर 2024 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर कुटुंबियांनी दोघांना स्वीकारलही होते. आम्ही आनंदाने संसार करत होतो. भांडणंही होत नव्हती. तिचा मेसेज ऐकून मला रडूच कोसळले. माझा अजूनही त्या मेसेजवर विश्वास नाही. ती तशी नाहीए, कुणीतरी बळजबरीने तिला असा मेसेज करायला लावला असेल. तुम्ही माझी पत्नी शोधून द्या.'

पतीची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली आहे. ऑडिओ मेसेजमधील आवाज पत्नीचाच आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. शिवाय, लोकेशनही पोलिस शोधत आहेत. त्याचबरोबर पळून गेलेल्या विवाहिताच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स काढून पोलिस तिने कुणाला फोन केले होते हे शोधून काढत आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

'प्रेमात माझी वाट लागली', स्टेटस ठेवलं अन् घेतला जगाचा निरोप…

पत्नी मला मारते अन् तिची इच्छा आहे की माझा मृत्यू व्हावा…

मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…

प्रेमविवाह केलेल्या प्रेमीयुगलाने घेतला जगाचा निरोप…

धक्कादायक! प्रेम एकावर; सात फेरे दुसऱ्यासोबत अन् लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी…

The post प्रेमविवाहानंतर चार महिन्यातच पत्नी गेली दुसऱ्यासोबत पळून; मेसेज वाचून कोसळलाच… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka