Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्.

प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्.

कोल्हापूर : अनैतिक संबंधांचा जाब विचारल्याच्या रागातून पत्नीचा गळा दाबून मारहाण केल्याची कबुली गणेश शंकर हुबाळे (वय ४०, रा. सोन्या मारुती चौक, शनिवार पेठ, कोल्हापूर ) याने पोलिसांकडे दिली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या स्वाती (वय ३४) यांचा उपचारादरम्यान सोमवारी (ता. १६) दुपारी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गणेश याला अटक केली आहे.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि स्वाती यांचा १६ ऑगस्ट २०१२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. गणेश याचा बिंदू चौकात कोल्हापुरी फेटे विक्रीचा व्यवसाय आहे. या दाम्पत्याला १२ वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षीय मुलगा आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून गणेश याच्या अनैतिक संबंधांमुळे कुटुंबात वादाचे खटके उडत होते. सात फेब्रुवारीला स्वाती यांनी गळ्यातील सोन्याची चेन आणि आंबेवाडी (ता. करवीर) येथील प्लॉटचे काय केले, असा जाब विचारला. या रागातून त्याने पत्नीचा गळा दाबून हाताने मारहाण केली. त्यानेच गंभीर अवस्थेत पत्नीला कदमवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी (ता. १६) दुपारी स्वाती यांचा मृत्यू झाला. स्वाती यांचा भाऊ प्रवीण दगडू भाट (३७, रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर) यांच्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. अधिक चौकशीत त्याने पत्नीचा गळा दाबून मारहाण केल्याची कबुली दिली. न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली. सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

गणेश हुबाळे हा त्याच्या फेट्यांच्या दुकानात तरुणींशी अश्लील चाळे करीत होता. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या चाळ्यांचे चित्रीकरण झाले होते. यातील एक व्हिडिओ त्याच्या पत्नीच्या हाती लागला. पुराव्यांसह तिने जाब विचारताच त्याने वादाला सुरुवात केली आणि पत्नीचा गळा दाबला. आरोपीने निर्दयपणे गळा दाबल्याने स्वाती यांच्या घशाला गंभीर दुखापत झाली होती. श्वास घेणेही शक्य होत नव्हते. स्वरयंत्र खराब झाल्याने त्यांचा आवाज फुटत नव्हता. त्यामुळे पोलिसांना जबाब नोंदविता आला नाही, अशी माहिती स्वाती यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी दिली.

पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…

भिगवणमधील युवतीच्या अपहरण प्रकरणात आला नवा ट्विस्ट…

सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…

इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka