Dailyhunt
प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ.

प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ.

सोलापूर : सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केलेल्या युवकाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. माहेरी गेलेली पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याच्या कारणातून प्रेम अंकुश जाधव (वय 28) याने आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडीओ शूट केला. आपल्या मुलीसाठी भावनिक संदेशही त्याने दिली आहे.

प्रेम अंकुश जाधव (रा. तळे हिप्परगा, सोलापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. वर्षभरापूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यांपूर्वी त्याला मुलगी झाली. बाळंतपणासाठी पत्नी माहेरी गेली होती. मात्र, दोन महिने उलटूनही पत्नी पुन्हा नांदायला येण्यास तयार नव्हती, यामुळे प्रेम मानसिक तणावाखाली होता. होळी आणि शिमगा सणाचे औचित्य साधून प्रेमने आपल्या पत्नीला घरी परत येण्यासाठी अनेकदा विनवणी केली होती. मात्र, तिने नांदायला येण्यास नकार दिला. यामुळे तो खचून गेला होता. याच नैराश्यातून त्याने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमने मोबाईलवर व्हिडिओ शूट केला. गळफास घेण्याच्या तयारीत असताना त्याने आपल्या चिमुकल्या मुलीचा उल्लेख करत पत्नीला उद्देशून “माझ्या मुलीची काळजी घे” असे म्हटले आहे. यासोबतच त्याने पत्नीला एक ऑडिओ संदेश पाठवून आपली व्यथा मांडली आणि मृत्यूला कवटाळले. प्रेमने पत्नीला गोसावी भाषेत दोन ऑडिओ पाठवले. त्यात म्हटले, तू जे ऐकून करतेयस, स्वतःच्या पायावर धोंडा मारतेयस. मी किती दिवस फोन करतो, लेकराचं तोंड दाखवत नाहीस. तू आपलं देव सोडून दुसऱ्याकडे जातेयस. आईचं ऐकतेयस, माझ्या शब्दांना मान देत नाहीस. मी या जगात नसणार, लेकराला चांगलं सांभाळ. त्याला वळण लाव. माझ्यात चूक असेल तर पाया पडतो, पण दुसऱ्याचं ऐकू नकोस. माझ्या मातीला येऊ नको! हे शब्द ऐकत नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी तरळले.

दरम्यान, मध्यरात्रीच्या वेळी दुसऱ्या खोलीत असलेल्या प्रेमच्या भावाला काहीतरी आवाज आल्याने त्याने धावत जाऊन पाहिले. प्रेमला लटकलेल्या अवस्थेत पाहून त्याने तातडीने खाली उतरवले आणि उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल रुग्णालय पोलिस चौकीत करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. प्रेमच्या मागे आजी, भाऊ आणि विवाहित बहीण आहे. प्रेमच्या मृत्यूनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…

प्रेमविवाहानंतर दाजीला हॉटेलमध्ये जेवण करत असतानाच संपवलं…

सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य…

प्रेमविवाहाचा थरकाप उडवणारा शेवट; गरोदर पत्नीचे केले तुकडे अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka