Dailyhunt
प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्.

प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्.

र्धा: आर्वी तालुक्यातील पारडी येथील प्रेमी युगलाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमीयुगलाने काही दिवसापूर्वी पलायन केले होते. शनिवारी (ता. ३) दोघांचेही मृतदेह एका विहिरीत आढळून आले आहेत.

मृत मुलाचे नाव हर्षल बाबाराव वाघाडे (वय २२) असे आहे, मृत मुलगी अल्पवयीन आहे. शेतातील विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतदेहांची ओळख झाली. तळेगाव पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून, पुढील तपास करत आहेत.

हर्षल वाघाडे याचे गावातील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमसंबधांना घरच्यांचा विरोध होता. मुलगी अल्पवयीन असल्याने लग्न करणे शक्य नव्हते त्यामुळे दोघेही निराश होते. कुटुंबियांचा विवाहाला विरोध असल्याने दोघांनी पळ काढला. याबाबत 23 जानेवारीला तळेगाव श्यामजी पंत पोलीस ठाण्यात कुटुंबियाकडून तक्रार दाखल करण्यात आली. घरच्यांनी शोध घेतला पण सापडले नव्हते. शनिवारी पारडी शिवारातील एका विहिरीत दोघांचेही मृतदेह आढळून आहे. मृतदेह कुसूमदोडा शेतशिवारातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडले. दोघांनीही एकमेकांना ओढणीने घट्ट बांधून विहिरीत उडी मारल्याचे प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी म्हटले आहे.

दोघेही एकाच परिसात राहत असून गेल्या दोन अनेक दिवसांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. अनेक वेळा कुटुंबियांनी दोघांना परस्पर समजही दिली होती. मात्र आपल्या प्रेमाला विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून दोघेही घराबाहेर पडले. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ते सापडले नाही. त्यानंतर त्यांचा मृतदेह विहीरीत आढळून आला. या घटनेमुळे वर्ध्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे…

हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

प्रेमविवाहानंतर गावातील युवकासोबत सुरू झाले प्रेमसंबंध अन् पुढे…

प्रेम! युवकासह अल्पवयीन मुलीने सोबतच घेतला जगाचा निरोप…

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

The post प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka