Dailyhunt
प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल.

प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल.

डचिरोली : प्रेमीयुगुलाने एकत्र आत्महत्या केल्यानंतर युवतीच्या वडिलांनीही आत्महत्या केली आहे. युवतीने आणि तिच्या प्रियकराने एकत्र ६ ऑक्टोबरला गळफास घेत आत्महत्या केली होती. मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने कुणालाही न सांगता वडील घरातून निघून गेले.

त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गडचिरोली जिल्ह्यातल्या लक्ष्मीपूर इथं ही घटना घडलीय.

जयदेब समीरण मंडल (वय २०) या युवका सोबत अमेला अमित रॉय (वय १८) या युवतीचे प्रेमसबंध होते. दोघेही ५ ऑक्टोबरला बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी दोघांचा शोध घेतला पण ते आढळले नव्हते. लक्ष्मीपूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या झोपडीत दोघांनी एकत्रच जीवन संपवले. दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते.

मुलीने प्रियकरासोबत गळफास घेतल्याचे समजतचा अमेलाचे वडील अमित अनिल रॉय हे दुपारपासून घरातून बेपत्ता झाले. मोबाईलसुद्धा बंद केला होता. अमित यांचाही बराच शोध कुटुंबियांनी घेतला. शेवटी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली. त्यांच्या शेवटच्या लोकेशननुसार शोध घेण्याचा प्रयत्न केला. अमित रॉय यांचा मृतदेह ७ ऑक्टोबरला सकाळी जंगलात आढळला. त्यांनी एका झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.

धावत्या कारमध्ये प्रेमीयुगलाचे अश्लील चाळे अन् पोलिसांची कारवाई…

प्रेमीयुगलच्या खोलीत मॅनेजरने खिडकीतून डोकावले अन् बसला धक्का…

नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत संपवले जीवन…

हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…

प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्…

The post प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka