Dailyhunt
प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी.

प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी.

मुंबई: चेंबूर येथे राहणाऱ्या एका विवाहित युवकाने कौटुंबिक वादातून ऐरोली खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने युवकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

युवक त्याच्या मैत्रिणीसोबत ठाण्यातील एका लॉजमध्ये गेला होता. याची माहिती त्याच्या पत्नीला मिळताच, तिने थेट लॉजवर जाऊन पतीला रंगेहाथ पकडले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद झाल्यानंतर पत्नी तिथून निघून गेली. त्यानंतर, बुधवारी रात्री पतीने पत्नीला फोन करून “माझी चूक झाली, आता मी माझ्या आयुष्याचं काहीतरी बरंवाईट करणार आहे” असे बोलून फोन कट केला.

पतीचा फोन आल्यानंतर पत्नीने तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने त्याचे लोकेशन शोधले. यावेळी तो ऐरोली खाडी पुलाजवळ असल्याचे लक्षात आले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना पुलावर एक रिक्षा उभी दिसली, जी त्या युवकाचीच असल्याचे पत्नीने ओळखले. रात्रीच्या अंधारामुळे त्याला शोधणे शक्य झाले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तो खाडी पुलाच्या खाली एका खांबाला लागून असलेल्या सळईला धरून उभा असल्याचे दिसले.

पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने त्याची सुखरूप सुटका केली. या घटनेनंतर, पोलिसांनी त्या युवकाला समुपदेशन केंद्रात पाठवले आहे.

प्रेमप्रकरणाचा ट्रँगल! डॉक्टरने पत्नीला रंगेहाथ पकडले अन् केला भयंकर शेवट…

पुणे! बायकोला प्रियकारासह रंगेहात पकडलं अन् दोघांनाही जागेवरच संपवलं…

Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…

नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…

The post प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka