Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग.

प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग.

डेहराडून (उत्तराखंड): हल्दवानी येथील प्रसिद्ध अंकित चौहान हत्याकांडानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉली आर्या उर्फ ​​माही सिंग हिला पोलिसांनी अटक करण्यात आली असून, तिने याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे.

माहीसोबत तिचा प्रियकर दीप कंदपाल यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही रुद्रपूर येथून अटक करण्यात आली. 14 जुलै रोजी अंकितची हत्या करून दोन्ही मुख्य आरोपी फरार झाले होते. मात्र, या हत्याकांडातील आरोपी सर्पमित्राला यापूर्वीच पोलिसांनी पकडले. पोलिसांनी 18 जुलै रोजी रमेश नाथ नावाच्या या सर्पमित्राला अटक केली होती. यानंतर त्याने या संपूर्ण खुनाची माहिती दिली होती.

मृत अंकित चौहान हा व्यवसायाने व्यापारी होता. 14 जुलै रोजी अंकितचा मृतदेह त्याच्या कारच्या मागील सीटवर पडलेला आढळून आला होता. अंकितच्या शवविच्छेदनानंतर पोलिसांनी कसून तपास केला. अंकीतच्या दोन्ही पायांच्या मागील भागात दोन वेळा सर्पदंशाच्या खुणा आढळून आल्या. शवविच्छेदन अहवालातही सर्पदंशाने हा मृत्यू झाला आहे, अशी पुष्टी डॉक्टरांनी केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला होता. माहीला अंकितसोबत लग्न करायचे होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

अंकित आणि माही या दोघांमध्ये मैत्री झाली होती. अंकित दर शनिवारी माहीच्या घरी राहायचा. याठिकाणी दोघेही पार्टी करायचे आणि सोबत एकत्र दारू प्यायचे. पुढे दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. अंकितने अनेकदा तिच्या घराची तोडफोडही केली. दुसरीकडे माहीलाही अंकितने दुसऱ्या मुलीशी मैत्री केल्याचा राग येऊ लागला. अंकितच्या वागण्यावरून, तो तिच्या लग्न करणार नाही, असे माहीला कळले. माहीच्या मनात अंकितबद्दल द्वेष वाढू लागला. माहीने तिच्या घरात 2022 मध्ये कालसर्प दोषाची पूजा एका सर्पमित्राद्वारे केली होती. पूजेसाठी सर्पमित्राने जंगलातून एक नाग आणला होता आणि पूजा विधी पूर्ण करून त्या सापाला त्याने जंगलात सोडले होते.

माहीने सर्पमित्र रमेश नाथ यांच्याकडून दीक्षा घेतली. तेव्हापासून सर्पमित्र तिच्या घरी येऊ लागला. माहीने या सर्पमित्रासोबत माहीने सर्पमित्राशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच आर्दश नर्सरीजवळ राहणाऱ्या उषा देवी यांना माहीने वर्षभरापूर्वी तिच्या घरी कामावर ठेवले होते. त्यामुळे उषा देवी आणि तिचा नवरा रामअवतार याचेही माहीच्या घरी येणे जाणे सुरू झाले. पण अंकितच्या मारहाणीमुळे माही कधी कधी रामअवतारच्या झोपडीत जाऊन राहायची. तसेच ती कधी कधी त्याठिकाणी जेवायलाही जायची. अखेर तिने सर्पमित्राच्या मदतीने अंकित चौहान याची हत्या केली.

The post प्रियकराचा काटा काढण्यासाठी जंगलातून आणला नाग… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka