Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म.

प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म.

त्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात अल्पवयीन अविवाहित मुलीने बाळाला जन्म दिला आहे. या घटनेनंतर प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून हा गुन्हा मध्य प्रदेशातील निवाली (ता. शेंदवा, जि. बडवाणी) पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. लोकेश आसाराम सोळुंके (वय 23) असे प्रियकराचे नाव आहे. पीडिता मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. दहावीत शिकत असताना तिची लोकेश सोळंके सोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. पीडितेच्या मैत्रिणीच्या किरायाच्या खोलीत दोघांच्या भेटी होऊ लागल्या. याच काळात दोघांमध्ये शरीरसंबंध आल्याने पीडिता गर्भवती राहिली. ही माहिती तिने लोकेशला दिली असता, आपण पोलिस भरतीचा पेपर देणार आहे. त्यानंतर लग्न करतो, असे सांगून तो निघून गेला.

पीडिताने लोकेशची तीन महिने त्याची वाट पाहिली. मात्र, तो काही परत आलाच नाही. या काळात तिचा गर्भ आठ महिन्यांचा झाल्यावर अखेर आई-वडिलांनी तिला बाळंतपणासाठी बहिणीकडे छत्रपती संभाजीनगर येथे पाठविले. तिच्या बहिणीने 19 सप्टेंबरला तिला घाटीत दाखल केले. तेथे तिचे नाव आणि वय नोंदविल्यानंतर ती 18 वर्षे 1 महिन्यांची असल्याचे स्पष्ट झाले. 18 व्या वर्षीच बाळंतीण होत असल्यामुळे अल्पवयीन असताना ती गर्भवती राहिली, हे स्पष्ट होताच डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी जबाब घेऊन आकाश सोळंके याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र, अत्याचाराची घटना मध्य प्रदेशात घडली असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील तपास मध्यप्रदेश पोलीस करणार आहे.

दरम्यान, पीडित मुलीने आपण गर्भवती असल्याचे आकाशला सांगितले. पण आपण लवकरच नोकरीला लागणार असून, पोलीस भरतीचे पेपर देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. तेथून आल्यावर आपण लग्न करू असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पिडीत मुलीच्या लक्षात आले. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…

अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…

नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…

सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…

The post प्रियकराची वाट पाहून आलाच नाही; अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka