Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियकरासोबत आयटी युवतीचे ब्रेकअप अन् पुन्हा तो म्हणू लागला.

प्रियकरासोबत आयटी युवतीचे ब्रेकअप अन् पुन्हा तो म्हणू लागला.

पुणे: पुण्यातील एका आयटी युवतीला तिच्या माजी प्रियकराकडून लग्नासाठी तगादा लावण्यात येत होता. युवतीने नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या युवकाने त्यांच्या रिलेशनशिपमधील खासगी फोटो आणि व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी अलंकार पोलिस स्टेशनमध्ये युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फक्त पोलिसांसाठी! 'सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आणि फिर्यादी युवती हे दोघंही मूळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, मागील वर्षी काही कारणांमुळे त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी ब्रेकअप केले. मात्र, आरोपी युवकाने समजवण्याचा प्रयत्न करत लग्नाची मागणी घातली. ब्रेकअप झाल्यानंतरही आरोपी युवक गेल्या काही दिवसांपासून युवतीच्या मागे लागला होता आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. युवतीने जेव्हा त्याच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला, तेव्हा युवकाने त्यांच्या पूर्वीच्या संबंधांमधील फोटो आणि व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर टाकण्याची धमकी दिली.

आरोपीच्या या धमकीमुळे घाबरलेल्या युवतीने अलंकार पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपी युवकाचा शोध सुरू केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…

पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka