लखनौ (उत्तर प्रदेश) : एका विवाहित महिला तिच्या प्रियकराच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये गेले होते. दोघे नको त्या अवस्थेत असतानाच नवरा पोहचला. महिला घाबरली आणि पेटीकोट आणि ब्लाऊजवर असतानाच थेट हॉटेलच्या बाल्कनीतून उडी मारली.
संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महिलेनं आपला नवरा आणि मुलांना सांगितलं की, ती काही कामानिमित्त बाहेर जात आहे. प्रत्यक्षात ती तिच्या प्रियकरासोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. नवऱ्याला संशय असल्यामुळे तो आपल्या मुलांना घेऊन त्या हॉटेलमध्ये पोहोचला. चौकशीनंतर त्याला बायकोची हॉटेलमधील रूम नंबर समजली आणि तो थेट तिथे पोहोचला. दरवाजा उघडताच पत्नी आपल्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत होती. संतप्त नवऱ्याने रूममध्ये गोंधळ घातला आणि वाद सुरू झाला. यावेळी महिला केवळ पेटीकोट आणि ब्लाऊजमध्येच होती. तिने आहे त्या अवस्थेतच थेट हॉटेलच्या बाल्कनीतून उडी मारली आणि शेजारच्या घराच्या बाल्कनीत पोहोचली. पुढे अरुंद भिंतीवरून चालत खाली रस्त्यावर उडी मारली आणि पळून गेली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ कोणी तरी शूट केला, जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं की, अद्याप यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र व्हिडिओच्या आधारे तपास सुरू आहे.
The post प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीने बाल्कनीतून मारली उडी… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

