Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न.

प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न.

झाशी: लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात एका पतीने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला स्वतःच्याच घरात आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील चिरगाव येथे ही घटना घडली आहे.

या घटनेनंतर संतप्त झालेला पती आणि स्थानिक गावकऱ्यांनी त्या महिलेचे तिच्या प्रियकरासोबत थेट घरातच आणि आहे त्या अवस्थेत लग्न लावून दिले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हाती आलेल्या वृत्तानुसार, चिरगाव येथील तालाबपुरा मोहल्ल्यात राहणाऱ्या राजेश प्रजापती यांचा विवाह २४ जून रोजी मध्य प्रदेशातील भंडार येथील अभिलाषा या तरुणीशी हिंदू रीतिरिवाजांनुसार झाला होता. मात्र, लग्नानंतर अवघ्या दोन-तीन आठवड्यांतच पतीला पत्नीच्या चारित्र्याबाबत शंका आली. पत्नी आपल्याला चहा, दूध आणि अन्नातून गुंगीची औषधे देत असल्याचा गंभीर आरोप प्रजापती यांनी केला आहे. यामुळे आपल्याला सतत शारीरिक अस्वस्थता जाणवते, असे त्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka