Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियकरासोबत फिरायला गेली, परंतु मृतदेह घरी आला.

प्रियकरासोबत फिरायला गेली, परंतु मृतदेह घरी आला.

पालघरः प्रियकरा सोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा (वय १७) थेट मृतदेहच घरी परतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ही मुलगी गेल्या आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली होती.

मात्र दोन दिवसांनी ती मरण पावल्याचा भ्रमणध्वनी तिच्या कुटुंबीयांना आला. तिच्या प्रियकरानेच ही हत्या केल्याचा आरोप, मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला. मात्र या मृत्यूमागचं गूढ अद्याप कायम असून, पालघर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, यासंदर्भात कासा पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद झाली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या मुलीची प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात न नेताच तिच्या शेजारी बसून येशूची प्रार्थना करण्यात प्रियकराने वेळ घालवला, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. हा मृत्यू नैसर्गिक नसून, घातपात आहे आणि प्रियकरासह दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणी शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमर पाटील यांनी दिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka