Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर.

पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर.

पुणे : भिगवण (ता. इंदापूर) प्रकरणातील अपहरण झाल्याची तक्रार असलेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाली होती. यानंतर मुलीची आई बारामती पोलिस स्टेशनला आली होती.

मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. पोलिसांनी संबंधित युवतीला साडे बारा वाजता कोर्टात हजर केले. यानंतर संबंधित युवतीची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, मुलाची चौकशी करुन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

भिगवण घटनेतील युवतीला न्यायालयात हजर केल्यानंतर तिचा जबाब नोंदवला गेला. जबाब नोंदवल्यानंतर मुलीचे मेडिकल करून पुनर्वसन केंद्रात तिची रवानगी करण्यात आली. तर मुलाबाबत चौकशी करून पुढचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. युवक आणि युवती भिगवममधून बाहेर पडल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाले होते.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती दिली. मुलीच्या आई आणि भावाचं म्हणणही ऐकून घेतले आहे. त्या मुलीने आपल्या आई आणि भावासमोर देखील आपले म्हणणं मांडले आहे. मात्र तिच्या आई आणि भावाचा वेगळा आरोप असल्याने आम्ही आता आणखी चौकशी करत आहोत. संबंधित युवतीने कोर्टासमोरही तिचं सगळं म्हणणं मांडले आहे.

शिवाय, संबंधित युवतीने एक प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होते. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेलो, असे म्हटले आहे. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचेही युवतीने प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka