Dailyhunt
पुणे ! ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार.

पुणे ! ड्यूटी संपवून घरी जाणाऱ्या पोलिसावर दोघांकडून कोयत्याने वार.

पुणे: पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी ड्यूटी संपवून घरी जात असताना दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना लॉ कॉलेजरोडवर रविवारी (ता. ५) रात्री एकच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिस ड्यूटी संपवून घरी जात असताना रविवारी रात्री एकच्या सुमारास लॉ कॉलेजरोडवर दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांनी गुन्हे शाखा युनीट-3 मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादात हा प्रकार घडला आहे. या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी कोयता हल्ला करणाऱ्यांना पोलीस शोध घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka