Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात क्रूरतेचा कळस! पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ओतलं ॲसिड अन्.

पुणे जिल्ह्यात क्रूरतेचा कळस! पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ओतलं ॲसिड अन्.

पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरामध्ये नवऱ्याने क्रौर्याचा कळस गाठल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकून १५ दिवस घरात कोंडले. चारित्र्यावर संशय घेत 'फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही' या विकृत मानसिकतेतून नवऱ्याने (वय २४) पत्नीला अमानुष मारहाण करून तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतले.

या कृत्यानंतर आरोपीने पीडितेला रुग्णालयात न नेता तब्बल १५ दिवस घरातच डांबून ठेवले होते. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती दारू पिऊन २० एप्रिल रोजी घरी आला आणि 'तू कामावर जातेस, तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते सांग,' असे म्हणत त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर धमकी देत त्याने ॲसिडची बाटली आणून तिच्या गुप्तांगावर ओतले. असह्य वेदनेने महिला जिवाच्या आकांताने ओरडत होती. तिने घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमाने घराचा दरवाजा आतून बंद करून तिला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या तिच्या जावेने सासू-सासऱ्यांना फोन करून बोलावले. मात्र, तोपर्यंत आरोपीने याबद्दल कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत घरातून पळ काढला.

नवरा कामावर गेल्याची संधी साधून पीडितेने आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेतले आणि थेट माहेर गाठले. तिथे तिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. या घटनेने हादरलेल्या नातेवाईकांनी तिला उरुळी कांचन पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पीडितेला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर पीडितेने शुक्रवारी (ता. १५) तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! नवऱ्याचे गुप्तांग दाबून संपवलं अन् सकाळी उठल्यानंतर…

मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka