Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या.

पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या.

पुणे : बारामती येथील नवऱ्याने आपल्या पत्नीला एसयूव्हीखाली चिरडून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. आरोपीने प्रथम एसयूव्हीमधून बाहेर ढकलले आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला तिला मारहाण केली आणि मग तिची हत्या केली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय आणि पत्नी शैला (वय २८) गुरुवारी सकाळी गणगपुरा येथे प्रवास करत होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, बल्लूरगा गावाजवळ या जोडप्यात वाद झाला आणि अक्षयने शैलाला गाडीतून बाहेर ढकलले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, ही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शैला मदतीसाठी याचना करत असताना अक्षय तिला निर्घृणपणे मारहाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. शैलाला मारहाण केल्यानंतर अक्षयने तिच्या अंगावरून एसयूव्ही चालवली.

अक्षय आणि शैला यांच्या लग्नाला चार वर्ष झाली होती आणि हे दोघंही मूळचे बारामतीचे होते, अशी माहिती कर्नाटक राज्यातील कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक अड्डुरु श्रीनिवासुलू यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार शैलाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अक्षयला होता आणि या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी आरोपी पती अक्षय याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka