Dailyhunt
पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू..

पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू..

चाकण (पुणे) : चाकण पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले सहायक फौजदार बाबूराव मानसिंग राठोड (वय ५०) यांचा ब्रेन हॅमरेज (मेंदूतील रक्तस्राव) झाल्याने आणि हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे.

राठोड यांच्या मृत्युमुळे पोलिस दलातील सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड हे सोमवारी (ता. ८) रात्री ड्युटीवर असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. यामुळे उपचारासाठी त्यांना चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना प्रथमदर्शनी हार्ट अटॅक व ब्रेन हॅमरेज झाला आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, राठोड यांचे मूळ गाव सोलापूर येथील उद्धवनगर (विजापूर रस्ता) आहे. त्यांच्या मागे एक पाच वर्षांचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. राठोड यांनी सिंधुदुर्ग येथे यापूर्वी सेवा केली होती. पाच वर्षांपासून ते चाकण येथे चाकण शहर बीट सांभाळत होते.

The post पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू…. appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka