Dailyhunt
पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं.

पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं.

पुणेः पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगलामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला आणि चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रियकराने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (ता. 19) ही घटना घडली आहे. सोनाली राजू जाधव (वय 28, रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. सखाराम धोंडिबा वालकोळी (वय 58, रा. निडगुरसर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनील निकम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सखाराम हा प्रेयसी सोनालीसोबत बुधवारी (ता. 19) सायंकाळी सातच्या सुमारास वांबोरी परिसरातील पिलेश्वर देवस्थान मंदिर परिसरात गेले होते. यावेळी प्रेयसी सोनाली ही आरोपी सखारामकडे पैशाची मागणी करू लागली. ‘मला पैसे दे नाहीतर मी पोलिसात तक्रार करीन,’ असे ती म्हणात होती, त्यावरून सोनाली व सखाराम यांच्यात वाद झाला. त्यानंतर सखारामने सोनाली हिच्या मानेवर कोयत्याने वार केला, यामध्ये तिचा मृत्यू झाला. कोयत्याचा वार इतका जोरात होता, त्यामुळे सोनालीचे शीर धडावेगळे झाले. त्यानंतर आरोपी सखाराम वार केलेला कोयता घेऊन जवळपास चार किलोमीटर अंतर चालत रात्री दहाच्या सुमारास वांबोरी पोलिस दूरक्षेत्रात पोहोचला. तेथे त्याने स्वतःच फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. ‘मी माझी प्रेयसी सोनालीला ठार मारले आहे,’ असे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी सोनाली हिचा मृतदेह पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वांबोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तेथून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे वांबोरी परिसरात खळबळ उडाली आहे. बाहेरगावावरून आरोपी त्या ठिकाणी का आला होता? त्याने आपल्या प्रेयसीची हत्या नेमकी कोणत्या कारणावरून केली? फक्त पैशावरून वाद होता का? तो वांबोरीपर्यंत कोणत्या वाहनाने आला? या बाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

लिव्ह इनमधील प्रेयसीचा खून केला अन् मुलाला आळंदीत सोडलं…

पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्…

प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावलं अन् खेळ खल्लास केला…

प्रियकराने केली प्रेयसीची हत्या; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर…

पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…

पोलिसांना यश! शारीरिक संबंधास नकार दिल्याने प्रेयसीला पुलावरून ढकलले…

The post पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka