Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा.

पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा.

पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लकडी पुलाजवळील नदीपात्रात झालेल्या कृषल कसबे याच्या हत्येचे छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला हडपसर परिसरातून ताब्यात घेतले.

आरोपी कर्नाटकात पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

गंज पेठ येथील रहिवासी कृषल कसबे (वय ४२) यांचा मृतदेह रविवारी नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत आढळून आला होता. धारदार चाकूने गळा चिरून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांना तपासादरम्यान संशयित आरोपी हडपसर परिसरात असल्याची माहिती मिळाली. ओंकार कांबळे (वय २७, रा. धनकवडी) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार कर्नाटक राज्यातील गदग येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, बुधवारी (ता. २२) सायंकाळी पोलिसांनी सापळा रचून त्यांना हडपसरमध्येच पकडले.

प्राथमिक तपासात ही हत्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या हत्येमागे अजून काही जुने वैमनस्य किंवा अन्य काही कारण आहे का, याचा शोध डेक्कन पोलिस घेत आहेत. पोलिस अंमलदार आकाश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka