Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का.

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का.

पुणे: लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रिलेशनशीपमध्ये असताना युवतीचे शरीर संबंधाच्यावेळी नकळत काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ इंटरनेटवर पोर्न साईटवर व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com

युवतीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून शरीर संबंधाच्या वेळी नकळत काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ इंटरनेटच्या पोर्न साईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत युवतीने (वय २४) अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनय शिरीष कुलकर्णी (वय 27, रा. फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 30 डिसेंबर 2023 ते 12 मे 2025 या दरम्यान घडला असल्याची माहिती आहे.

पीडित युवती एका कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करीत आहे. विनय कुलकर्णी हा अ‍ॅटोमोबाईल इंजिनिअर आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यातून दोघांच्या सहमतीने शरीरसंबंध निर्माण झाले होते. त्यावेळी तिच्या नकळत विनय कुलकर्णी याने तिचे नग्न अवस्थेतील व्हिडीओ काढले होते. काही कारणाने त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाला. पुढे, युवतीने विनय कुलकर्णी याला लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर गेल्या एक वर्षांपासून त्यांच्यामध्ये कोणताही संपर्क नव्हता. पण, युवतीच्या एका मैत्रिणीला पोर्न साईटवर तिचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ दिसला. या मैत्रिणीने तिला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पीडित युवतीने अलंकार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे तपास करीत आहेत.

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला…

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka