पुणेः पिंपरी-चिंचवड परिसरात एका युवतीची दोन परप्रांतीय युवकांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी भररस्त्यात युवतीचा खून केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोमल भरत जाधव (वय १८) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. ती पिंपरी चिंचवड शहरानजीक असलेल्या वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहते. दुचाकीवरुन आलेल्या दोन जणांनी रविवारी रात्री तिची निर्घृण हत्या केली. दोन्ही आरोपी मृत युवतीचे ओळखीचे असल्याची माहिती समोर आली असून ते मुळचे दिल्लीचे रहिवासी आहेत.
फक्त पोलिसांसाठी! 'सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!'
कोमल आपल्या घरात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवले. कोमल घराच्या खाली असता आरोपींनी तिच्यावर निर्दयीपणे सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, कोमल जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
आरोपींनी अंगात काळे कपडे आणि हेल्मेट घातल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र चिंचवड पोलिसांचे डीबी स्कॉड, तपास पथक आणि गुंडा विरोधी पथकाने तातडीने आरोपींचा माग घेतला. आणि अवघ्या काही तासातच आरोपींना जेरबंद केले. दोन्ही आरोपी दिल्लीचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या ते कुठे राहत होते, ते हत्या करण्यासाठी दिल्लीवरून आले होते का? याचा तपास पोलिस करत आहेत. आरोपींनी प्रेम प्रकरणातून कोमलची हत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. ण एका तरुणीची अशाप्रकारे भररस्त्यात हत्या झाल्याने पिंपरी चिंचवडसह संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
आरोपींनी अंगात काळे कपडे आणि हेल्मेट घातल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. मात्र चिंचवड पोलिसांचं डीबी स्कॉड, तपास पथक आणि गुंडा विरोधी पथकाने तातडीने आरोपींचा माग घेतला. आणि अवघ्या काही तासातच आरोपींना जेरबंद केलं. दोन्ही आरोपी दिल्लीचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या ते कुठे राहत होते, ते हत्या करण्यासाठी दिल्लीवरून आले होते का? याचा तपास पोलिस करत आहेत. आरोपींनी प्रेम प्रकरणातून कोमलची हत्या केली असावी, असा अंदाज केला जात आहे. पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, युवतीची अशाप्रकारे परप्रांतीय युवकांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे! दाजीने केला घटस्फोटित मेव्हणीच्या प्रेमाला विरोध अन् नको ते घडलं…
पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…
पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…
पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न…
प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…
The post पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

