पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठेतील रेड लाइट परिसरात पुणे पोलिसांनी छापेमारी करत कुंटणखान्यांमध्ये असलेल्या महिलांची पडताळणी केली. या कारवाई दरम्यान वेश्याव्यवसाय करत असलेल्या ११ महिला बांगलादेशी असल्याचे त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीतून उघड झाले.
यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या महिलांना बांगलादेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे शहरात रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान काय घडलं; पोलिसांचा प्रचंड फौजफाटा…
पुण्यातील रेड लाइट परिसरात यापूर्वीही बांगलादेशी महिलांना आणल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी राबवलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये पुन्हा एकदा ११ बांगलादेशी महिला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवार पेठेत झालेल्या कारवाईचा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून आढावा घेण्यात आला आहे. अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाईचा आढावा घेण्यासाठी स्वतः पोलिस आयुक्त रस्त्यावर उतरले. स्वतः पोलिस आयुक्त फरासखाना पोलिस ठाण्यात पोहचले. पुण्यातील बुधवार पेठेतून ११ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी सुरुवातीला म्हणालो होतो बुधवार पेठेत बेकायदेशीर हालचाली आहेत, त्यावर कारवाई केली जाणार सांगितले होते. त्यानुसार आम्ही काल रात्री पुन्हा कारवाई केली. काल रात्री कारवाई करण्यात आली, यात ११ बांगलादेशी महिला सापडल्या. एकूण २२ महिलांना आम्ही ताब्यात घेतले आहे. बुधवार पेठ परिसरात अश्या हालचालींना मदत करणाऱ्या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. जे जे बेकायदेशीर आहे, सर्व इमारतींची तपासणी करून कारवाई केली जाईल. पोलीस दलाची सुरू असलेली कायदेशीर कारवाई गरज पडल्यास आणखी वाढवू. बुधवार पेठेत महिला आणणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाणार आहे. पिटा कायद्यांतर्गत करवाई सुरु आहे. जी कारवाई सुरू आहे, ती नियमांच्या अधीन राहून सुरू आहे.'
भारती विद्यापीठ परिसरातील महिलेचा खून प्रकरणात सामूहिक बलात्काराची घटना नाही. एक मृतदेह सापडला होता, देहविक्री करणारी महिला त्यांच्यासोबत गेल्याचे दिसून आलेले आहे. ६ आरोपी आमच्या ताब्यात आहेत, बलात्काराची कुठलीही घटना समोर आलेली नाही. हा फक्त मर्डरचा गुन्हा आहे, असेही पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.

