पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठ या रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई करत 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. विशेष कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली असून, या महिला बेकायदेशीरपणे भारतात राहून देह व्यापार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दोन प्रश्न विचारले अन् बांगलादेशी महिलांची पोलखोल झाली.
महिलांच्या बोलण्याची पद्धत आणि शब्द बांगलादेशी लोकांशी साधर्म्य दर्शवणारे होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली असता, या महिलांनी सुरुवातीला आपण पश्चिम बंगालच्या असल्याचा दावा केला होता. पण पोलिसांनी दोन प्रश्न विचारले अन् महिला बांगलादेशी असल्याचे सिद्ध झाले.
Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांनी महिलांना प्रथम राष्ट्रगीत म्हणायला लावले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानांचं नाव विचारलं, याचं उत्तर महिलांकडं नव्हते. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालमधील आसपासच्या गावाची नावं विचारली, ती देखील त्यांना सांगता आली नाही. पाचही महिला समाधानकारक उत्तरे देऊ शकल्या नाहीत. यावरून त्या बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले अन् पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. फरासखाना पोलिसांनी रविवारी रात्री 1 ते सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बुधवार पेठ परिसरातील माचिस बिल्डिंग आणि इतर भागात शोधमोहीम राबवली होती.
बांगलादेशी महिलांनी सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता आणि त्या स्वतःच्या इच्छेने या व्यवसायात सहभागी होत्या, असे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी सांगितले. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईत गेल्या 11 महिन्यांत तब्बल 95 बांगलादेशी नागरिकांना पुणे शहरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई…
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली ड्रग्ज मुक्त प्रभाग व ड्रग्ज मुक्त पुणे…

