Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती.

पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती.

पुणे: पुणे शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणे पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

पुणे शहराची सध्याची लोकसंख्या पाहता, पोलिस दलात किमान २० ते २१ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या केवळ १० हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. निम्म्या मनुष्यबळावर कामाचा ताण असल्याने पोलिसांना अनेकदा २४-२४ तास ‘ऑन ड्युटी’ राहावे लागते. याचा थेट परिणाम पोलिसांच्या मानसिक आरोग्यावर आणि कौटुंबिक जीवनावर होत आहे. गेल्या वर्षी शहरात पाच नवीन पोलिस ठाणी सुरू झाल्याने या मनुष्यबळाची चणचण अधिकच भासत आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस भरतीसाठीची मैदानी चाचणी अंदाजे १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. या शारीरिक चाचणीसाठी राज्यभरातून हजारो युवक पुण्यात येण्याची शक्यता असून, पोलिस प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka