पुणे: प्रेमविवाह केलेल्या एका विवाहित युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी मृत युवतीच्या नवऱ्याला अटक केली असून, त्याची प्रेयसी आणि त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
वृषाली भीमराव आरडे ऊर्फ वृषाली रोहित घोडे (वय 25) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती रोहित मच्छिंद्र घोडे आणि त्याची प्रेयसी तृप्ती वाकचौरे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वृषालीची आई लक्ष्मी आरडे (रा. इंदापूर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वृषाली आणि रोहित यांनी सप्टेंबर 2021 मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ बारामती येथे राहिल्यानंतर ते दोघेही नोकरी आणि उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले होते. दोन वर्षांपासून ते उरुळी देवाची येथील 'वैष्णव सिटी' परिसरात भाड्याने राहत होते. रोहित हा'डी-मार्ट'मध्ये (D-Mart) नोकरी करत होता.
रोहित डी-मार्टमध्ये कामाला असताना तिथेच काम करणाऱ्या तृप्ती वाकचौरे नावाच्या युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. पतीच्या या विवाहबाह्य संबंधांची माहिती जेव्हा पत्नी वृषालीला मिळाली, तेव्हापासून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. पतीच्या सततच्या त्रासाला आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर 27 जून रोजी वृषालीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना मृत वृषालीच्या मोबाईल फोनमध्ये तिने लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीमध्ये तिने आपल्या मृत्यूला पती रोहित आणि त्याची प्रेयसी कशी जबाबदार आहेत, याचा उल्लेख केल्याचे समजते. पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला असून, चिठ्ठीच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.
सांगली! प्रेमविवाहानंतर रात्रीच्या सुमारास दुसऱ्या प्रियकराला घरी बोलवलं अन्…
प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ…
युवतीच्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वादातून केली हत्या अन्…
प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…
प्रेमविवाह केलेल्या IAS अधिकाऱ्याच्या गर्भवती मुलीने संपवलं आयुष्य…

