Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या.

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या.

पुणे : पुणे शहरातील बालेवाडी परिसरात बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

राजेश कांबळे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे, तर राहुल शेषराव रिकामे आणि सय्यद जमीर उर्फ सहील बाब्या सय्यद असे हत्या केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याबाबत चतुशृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राहुल रिकामे याच्या बहिणीशी राजेश कांबळे याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. या संशयावरून या दोघांनी राजेश याला बालेवाडीच्या गोल्डन टेरेस सोसायटी जवळ भेटायला बोलावले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करण्यात आले. या घटनेत राजेश याचा मृत्यू झाला. आरोपींनी त्याची हत्या करून मृतदेह वाकडच्या नदीमध्ये फेकून दिला होता.

दरम्यान, दोन्ही आरोपींविरोधात चतुशिर्गींगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

The post पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka