पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या नऱ्हे येथील व्हिजन स्कूल जवळील रॉयल काउंटी इमारतीमधील फ्लॅटमध्ये बाप-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
रॉयल काऊंटी मध्ये अरुण बबनराव पायगुडे (वय ६४) व त्यांचा मुलगा ओंकार अरुण पायगुडे (वय ३३) हे राहत होते. दोघांमध्ये दारूवरून भांडण होत असल्याची माहिती शेजारी व सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिली. गेल्या चार दिवसांपासून घराचे दार आतून बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय आला होता.
इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण, घरामधून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी घरामध्ये दोघांचेमृतदेह दिसून आले. पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले असून व्हीसेरा राखून ठेवण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल यादव पुढील तपास करत आहेत.
The post पुणे शहरात बाप-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

