Dailyhunt
पुणे शहरात भाजप आमदाराची अजित पवार यांच्यासमोरच पोलिसाला मारहाण.

पुणे शहरात भाजप आमदाराची अजित पवार यांच्यासमोरच पोलिसाला मारहाण.

पुणे : राष्ट्रवादीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख जितेंद्र सातव यांना अजित पवार यांच्यासमोरच आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केली. याशिवाय कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना बाजूला उभा असणाऱ्या पोलिसाला देखील त्यांनी मारले आहे.

संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुनील कांबळे यांनी माञ राष्ट्रवादी पदाधिकारी जितेंद्र सातव यांना मारहाणीचे आरोप फेटाळून लावलेत. संबंधित कर्मचाऱ्याला मी कानशिलात नाही मारली तर फक्त जीना उतरताना बाजुला ढकललं, असा दावा भाजप आमदार सुनील कांबळे यांनी केला आहे.

पुणे शहरातील ससून रुग्णालयात नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह मान्यवरांची आज (शुक्रवार) उपस्थिती होती. यावेळी ही घटना घडली आहे.

ससून रुग्णालयात एका वॉर्डच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमस्थळीच झालेल्या या प्रकाराने सर्वजण चकीत झाले. भाषणावेळी अजित पवार यांनी आमदार सुनील कांबळे यांचा उल्लेख करत समजावून सांगितले होते. ससूनमध्ये नूतन इमारतीचे उद्घाटन सोहळा होता. ससून रुग्णालय सुनिल कांबळे यांच्या मतदारसंघात येते. अजित पवार भाषणात म्हणाले होते की, ‘आम्ही तुमचंही सहकार्य घेऊ, सूचना लक्षात घेऊ. ससूनच्या उद्घाटन कोनशिलेवर नाव नसल्याने याआधी त्यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आता पोलिस शिपायाला मारहाण केली. भाषण संपल्यानंतर सुनील कांबळे हे खाली उतरत होते. त्यावेळी त्यांनी बाजूला उभा असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला गालावर मारले. त्यांच्या या कृतीमुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

पोलिस शिपाई की हॉस्पिटलचे कर्मचारी हे अद्याप लक्षात आलेले नाही. बाहेर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी वाद घातला. नाव दिले होते पण कुठून नाव काढले गेले हे माहिती नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर माध्यमांशी न बोलता ते निघून गेले. कार्यक्रमावेळी दोनदा त्यांनी मारहाण केली आहे.

भाजप आमदार सुनील कांबळे बोलताना म्हणाले, ‘मी कार्यक्रमातून बाहेर पडलो. सकाळी लवकर उठल्यामुळे नाश्ता झालेला नव्हता, गोळ्या घ्यायच्या होत्या त्यामुळे घाईगडबडीत बाहेर पडलो. कार्यालयात आल्यावर मला माहिती पडलं की, हे सगळं लाईव्ह सुरू झालेले आहे. काय झालंय हेच मला कळालं नाही, मी कोणालाच मारहाण करण्याचा संबंधच नाही. तो कोण व्यक्ती आहे, मी त्याला ओळखत नाही, मी का मारू त्याला? मी समोरुन स्टेजवरुन उतरत असताना तो आडवा आला, मी त्याला ढकलून बाजूला झालो आणि तिथून लगेच निघालो. वाद झाला असता, मारहाण करायची असती त्याला, तर तिथे थांबलो असतो. मी बाजूला आलो.’

व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांबाबत विचारल्यावर सुनील कांबळे म्हणाले की, ‘तुम्ही नीट पाहा, मी काही पाहिलेलं नाही, तुम्ही बघ खात्री करा. मारहाण करायची किंवा कानशीलात मारण्याची काय पोझिशन असते, ते नीट पाहा. कोणीही आरोप केला असेल, पण मी त्यांना ओळखत नाही आणि ते मला ओळखत नाही. रुपाली चाकणकरांसोबत मी चालत होतो, त्यावेळी त्यांनी म्हटलं अरे आमदारांना पुढे जाऊ द्यात. तरी ते धक्का मारत होते, तिथे जे पोलीस होते त्यांनी बाजूला नेलं खाली त्यांचं जिन्यात काय झालं मला नाही माहिती, मी कार्यक्रमात निघून गेलो,’असेही सुनील कांबळे म्हणाले.

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…

Video: पोलिसकाकाला ट्रकचालकांची लाठ्या काठ्याने मारहाण…

Video: आंदोलन थांबवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…

Video: जवानाला भर रस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण…

Video: हडपसर पोलिसांनी गुन्हेगारांची काढली धिंड; पाहा नावे…

The post पुणे शहरात भाजप आमदाराची अजित पवार यांच्यासमोरच पोलिसाला मारहाण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka