Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक.

पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक.

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील हडपसरमधील ससाणे नगर परिसरात एका मांत्रिकाने युवकाला तब्बल अठरा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांत्रिक आईरा शॉब याने माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पैशाचा पाऊस पडतो असे आमिष अनेकांना दाखवत गंडा घालत होता. मांत्रिकांची आणि फिर्यादी छोटेलाल परदेशी यांची एका मित्रमार्फत भोंदू बाबा सोबत ओळख झाली होती. त्याने पैशाचा पाऊस पडतो असे सांगून फिर्यादी यांना एक अघोरी पूजा मांडायला सांगितली. पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलिस आले. त्यांनी बाबासह युवकाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पसार झाले. हा सगळा डाव या भोंदू बाबाने रचला हे कळताच फिर्यादी यांनी पोलिस ठाणे गाठले. भोंदू बाबा आईरा शॉब यांच्यासह माधुरी मोरे, रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा चार जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मांत्रिकांच्या आमिषाला बळी पडू नका, बळी पडलेले असाल तर पोलिसांकडे तक्रार करा असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

The post पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka