पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या गंगानगर परिसरात एका कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वर्चस्व वादातून ही टोळीयुद्धातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
राणा कांबळे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या राणा याला पुणे पोलिसांनी शहरातून तडीपार केले होते. मात्र, तडीपारीचा आदेश झुगारून तो गेल्या अनेक महिन्यांपासून छुप्या पद्धतीने वावरत होता. तडीपार असतानाही गंगानगर परिसरात त्याची मोठी दहशत होती. त्याच्यावर चोरी, मारामारीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.
Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
गंगानगर परिसरात राणा कांबळे आणि आरोपी गट यांच्यात जुन्या वर्चस्वावरून वाद सुरू होता. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांनी राणा याला गाठले. ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांनी पाठलाग करत राणावर धारदार कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात राणा कांबळे याचा जागीच मृत्यू झाला.
भर रस्त्यावर झालेल्या या खुनामुळे गंगानगर परिसरात दहशतीचं वातावरण पसरले आहे. या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडीओत दोन युवक राणा कांबळे याचा पाठलाग करताना दिसत आहेत. पाठलाग केल्यानंतर आरोपींनी धारदार कोयत्याने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात राणा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. मुख्य आरोपी ओम मोरे आणि त्याच्या फरार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
पुणे शहरातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे! युवकानं PMPML बस का पळवली? पोलिस तपासात धक्कादायक माहिती…
पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
पुणे शहरात सलूनमध्ये अंदाधुंद गोळीबार; पोलिसांनी जिवाची पर्वा न करता घातली झडप…
पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…

