Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये तिघांना लाखो रुपयांचा गंडा.

पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये तिघांना लाखो रुपयांचा गंडा.

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून वेगवेगळ्या आमिषांना बळी पडलेल्या तिघांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पहिली घटना…
टेलीग्रामद्वारे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगून तसेच लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने फिर्यादी (वय ४६) यांचा विश्वास संपादन केला आणि ६,७९,८३० रुपयांची फसवणूक केली. याबाबत पर्वती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर या पुढील तपास करत आहेत.

दुसरी घटना…
१०/०८/२०२५ ते दि. २६/०९/२०२५ रोजी चे दरम्यान ऑनलाईन माध्यमाव्दारे यातील फिर्यादी यांना नमुद मोबाईल धारक याने इंस्टाग्रामद्वारे संपर्क करुन लिंक पाठवुन डाऊनलोड करण्यास सांगून शेअर ट्रेनिंगमध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगुन फिर्यादी यांची १०,२४,८२५/- रु. किं.ची आर्थिक फसवणुक केली. याबाबत एका ६६ वर्षीय व्यक्तीने नांदेडसिटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

तिसरी घटना…
०१/०९/२०२५ ते दि. ०३/०९/२०२५ रोजी चे दरम्यान ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना नमुद मोबाईल धारक याने इंस्टाग्रामद्वारे संपर्क करुन लिंक पाठवुन हॉटेल रेटींग व बीटीसी कॉईन खरेदी करण्यास सांगून त्यामध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवुन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगुन फिर्यादी यांची ०५,०३,०००/- रु. किं.ची आर्थिक फसवणुक केली. याबाबत चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, या तिन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात आरोपींविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ऑनलाइन गुंतवणूक, टास्क, नोकरी किंवा जास्त परताव्याच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Cyber Crime! पुणे शहरातील सर्वात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka