पुणे : पुणे शहरात विविध ठिकाणांहून नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने युवक-युवती आलेले आहेत. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे पाहायला मिळाले.
पुणे शहरामध्ये ‘पुणे तिथे काय उणे’ या शीर्षकाखाली पोलिसकाका टीमने मालिका सुरू केली होती. पुणे शहरात रात्रीच्या वेळी विविध हॉटेल्समधील धांगडधिंगा आणि झिंगलेली तरुणाईबाबत वार्तांकन केले होते. यानंतर नियमबाह्य पद्धतीने रात्री हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.
पुणे शहरात सध्या पब कल्चर वाढताना दिसत आहे. अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात पब असून, तरुणाई नशेच्या आहारी जाऊन झिंगलेली दिसते. शहरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. नियमबाह्य पद्धतीने रात्री हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुर ठेवल्याप्रकरणी पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे शहरातील हॉटेल, पब, बारमध्ये उशीरापर्यंत पार्टी सुरू असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. दहा हॉटेल आणि पबवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात पुण्यातील दहा हॉटेल्स आणि पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी शहरतील गस्त देखील वाढवली आहे.
पुणे शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बंडगार्डन, बाणेर, बालेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. पबमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात. कपल एन्ट्री, फ्रि ड्रिंक शिवाय गर्ल्स नाईट यांसारख्या सवलतींना तरुणाई भाळून सध्या पब संस्कृतीकडे वळत आहे. पुण्यात अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून शिक्षणासाठी येतात. विविध मोठ्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात. पण, याच पुणे शहराच्या माहेरघरात या विद्यार्थ्यांचा पार्टी फिलर म्हणून वापर करण्यात येत आहे.
कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सची नावे पुढीलप्रमाणे…
– प्लंज, कोरेगाव पार्क
– लोकल गॅस्ट्रो बार
– एलरो
– युनिकॉर्न
– आर्यन बार, बालेवाडी
– नारंग वेंचर
– हॉटेल मेट्रो
– लेमन ग्रास, विमाननगर
– बॉलर
– हॉटेल काकाज

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…
पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…
लोणीकंद परिसरातील 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश…
पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
The post पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

