Dailyhunt
पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला 'I Love You' चा मेसेज अन्.

पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला 'I Love You' चा मेसेज अन्.

पुणे : विद्येच्या माहेरघरात शिक्षकीपेक्षाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीला शिक्षकाने 'I Love You' यूचा मेसेज केल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यासोबत या मुलीला शिक्षकाने व्हिडीओ कॉल केल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रमेश चव्हाण असे या शिक्षाकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. याच महाविद्यालयात रमेश चव्हाण शिक्षक आहे. या शिक्षकाने मुलीला वारंवार ‘I Love You’ असे मेसेज पाठवले. त्यानंतर तो शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही तर तिला व्हिडीओ कॉलदेखील केला होता. त्यासोबतच भर महाविद्यालयाच्या स्टाफ रुममध्ये बोलवून चुंबन हवंय का?, अशी विचारणा केली. या सगळ्या प्रकारामुळे मुलगी संतापली आणि तिने थेट शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रारीवरुन शिक्षकाला अटक केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर शिक्षकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून 15 वर्षीय मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर दोन युवकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना मांजरी परिसरातील नदीपात्रात घडली होती. या घटनेमुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे पीडित मुलीचे मित्र होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग व गणेश यांनी मुलीला फिरायला नेतो असे सांगून फिर्यादी यांच्या सोबत गाडीवर बसून मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेले. तिथे असलेल्या एकांताचा फायदा घेऊन अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे यांनी मुलीवर आळीपाळीने जबरदस्तीचे शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर मुलीला त्या निर्जनस्थळी सोडून निघून गेले. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…

शिक्षक बनवायचा अश्लील व्हिडिओ, पत्नीनेच केला भांडाफोड…

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…

संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…

विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…

The post पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला ‘I Love You’ चा मेसेज अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka