Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड.

पुणे स्टेशनवर महिलेसोबत ओळख अन् घरी आणल्यावर बाप-लेकाचं कांड.

पुणे : एका महिलेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. महिलेची हत्या केल्यानंतर तब्बल दोन ते तीन दिवस आरोपींनी महिलेचा मृतदेह घरात लपवून ठेवला आणि जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा मृतदेह कचरापेटीत फेकून सर्व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सुवर्णा (वय अंदाजे 40) असे मृत महिलेचे नाव असून, ती फिरस्ती असल्याची प्राथमिक माहिती आहे. येरवडा पोलिसांनी वडील आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

आरोपी युवक आणि मृत महिला यांची काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशन परिसरात ओळख झाली होती. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी त्याने तिला आपल्या येरवडा येथील घरात बोलावले होते. महिला घरी आल्यानंतर त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादही झाले होते. या वादात तरुणाच्या वडिलांनीही हस्तक्षेप केला होता त्यामुळे हा वाद वाढला आणि दोघांनीही रागाच्या भरात घरातच महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

वडील आणि पोराने केलेल्या मारहाणीत महिला रक्ताच्या थारोळ्यात जखमी होऊन जागीच कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. दोघांकडून झालेला गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह घरातच लपवून ठेवला. पण काही दिवसांनी मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने दोघांनी तो लोहगाव-वाघोली रोडवरील कचरापेटीत फेकून दिला. पोलिसांनी केलेल्या तपासात हा संपूर्ण प्रकार उघड झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…

पुणे शहरात दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात युवकाची हत्या…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka