Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार.

पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार.

पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनेच्या आत्महत्या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना या प्रकरणात अटक केली असून, राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा फरार आहे.

वैष्णवी हगवणे यांनी 16 मे रोजी आत्महत्या केली आहे.

पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com

जमीन खरेदीसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वैष्णवी हगवणे यांचे पती, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना 21 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी (ता. 16 मे) घरात बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा न उघडल्याने त्यांनी तो दरवाजा तोडला. त्यानंतर ही घटना समोर आली. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. व्हिसेरा राखून ठेवला असून तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली.

दरम्यान, वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे की, वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली. मारहाण व जाच करून तिच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहेत. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींना सापळा रचून पकडले अन् काढली वरात; पाहा Video…

पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…

पुणे! चाकण अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक; कबुली देताना निर्लज्यपणे म्हणाला…

पुणे! MBBSच्या विद्यार्थ्याने चिठ्ठी लिहून घेतला जगाचा निरोप; भावनिक चिठ्ठी..

पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

The post पुणे! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिघांना अटक तर दोघे फरार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka