Dailyhunt
सहलीची नाव उलटून १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू.

सहलीची नाव उलटून १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू.

डोदरा (गुजरात) : वडोदरामध्ये सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांची बोट तलावात उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. हरणी तलावात बोट उलटली. या बोटमध्ये 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते.

सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील आहेत. बचावकार्यात 13 मुलं आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आले आहे.

पाण्यातून वाचविण्यातून आलेल्या नऊ ते दहा विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 10 हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातग्रस्त सर्व विद्यार्थी वडोदरा येथील न्यू सनराईज स्कूलमधील असून ते येथे सहलीसाठी आले होते. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. सात एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर हरणी तलाव आहे. या तलावाचे सुशोभीकरण सन 2019 मध्ये करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केले की, “वडोदराच्या हरणी तलावात बुडून मुलांची बातमी खूप दुःखद आहे. ज्यांनी जीव गमावला त्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दुःखाच्या क्षणी मी दु:खी आहे. विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देव देवो. बोटीत बसलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.”

ताम्हिणी घाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; दोन महिलांचा मृत्यू…

शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षिकेचा रोमान्स अन् पुढे…

एकाच कुटुंबातील सात जणांनी घेतला जगाचा निरोप…

Video: संतापजनक! शिक्षिकेने 4 वर्षीय मुलीला मारले तब्बल 30 वेळा…

The post सहलीची नाव उलटून १२ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka