वाशीम : शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन चंद्रपूरला जाणाऱ्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील पोहा गावाजवळ मंगळवारी (ता. २६) हा अपघात घडला. चंद्रपूरचे एक कुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन घरी निघाले होते. समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असतांना अचानक नीलगाय आडवी आली. चालकाने गाडीचा अचानक ब्रेक मारला. मात्र त्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि डिव्हायडरला जाऊन धडकली. गाडीचे दोन्ही टायर फुटले. यावेळी झालेल्या अपघाता सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर अनेक वन्य प्राण्यांमुळे वाहनांना अपघात झाला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यात हरणे, नीलगायी तसेच कुत्र्यांचा समावेश आहे. या प्राण्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवे आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.
समृद्धी महामार्गावर सर्वाधिक बळी चालकाला येणाऱ्या झोपेमुळे गेल्याचे या अहवालात समोर आले आहे. चालकाला आलेल्या झोपेमुळे 12 अपघात घडले असून त्यामध्ये 44 जणांचा बळी गेला आहे. तर, ओव्हर स्पीडिंग म्हणजेच तीव्र गतीने वाहन चालवल्यामुळे 21 अपघात घडले असून त्यात 33 जणांचा बळी गेला आहे. टायर फुटल्यामुळे ही चार अपघात झाले असून त्यात 10 जणांचा बळी गेला आहे.
The post साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

