Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या.

सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या.

नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एका युवकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या दोन भावांनी आणि मेव्हण्याने मिळून युवकाचा खून केला आहे.

सचिन मोतीराम चौरे (वय २५, रा. नरूळ) असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत.

सचिन चौरे याचे आठंबे येथील युवतीसोबत गेल्या ८ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र, युवतीने सचिनसोबत लग्न लावून देण्याचा हट्ट धरला. याशिवाय तिने घरात जेवण करणं बंद केलं. अखेर मुलीच्या हट्टापुढे कुटुंबाला नमतं घ्यावं लागले. मुलीच्या वडिलांनी आणि मामाने सचिनच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यानंतर मुलगा (सचिन) आणि त्याच्या आई-वडिलांना साकोरेपाडा येथे बोलवून घेण्यात आले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने युवतीच्या लग्नाला होकार देण्यात आला आणि तिला सचिनसोबत पाठवले.

लग्नाला संमती मिळाल्यानंतर सचिनच्या बहिणीने आणि मेव्हण्याने या दोघांना रविवारी कन्हेरवाडी येथील आपल्या घरी नेले. मात्र, सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलीचे दोन भाऊ आणि मेव्हण्याने कन्हेरवाडी गाठले. त्यांनी सचिनवर तीक्ष्ण हत्याराने छातीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, सचिनचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार घडताच कन्हेरवाडी येथील स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत पळून जाणाऱ्या तिन्ही आरोपींना पकडले. संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

मृत सचिनच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातच आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आरोपींना सुरक्षितपणे पोलिस ठाण्यात हलवले. प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सैराट! नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर अन् पतीचा थरारक शेवट…

सैराट! प्रेमसंबंधातून युवतीच्या प्रियकराला घातल्या गोळ्या…

लातूर हादरलं! प्रेमप्रकरणातून वाद अन् इंस्टाग्रामवरून धमक्या; सुसाईड नोटमध्ये…

प्रियकर सक्षमचं घर का सोडलं? आंचलने सांगितलं धक्कादायक कारण…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka