Dailyhunt
सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या.

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या.

त्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात घडली आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय 35, रा.

तोंडापूर, ता. जामनेर) असे मृत महिलेचे नाव असून, तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकला बावस्कर यांचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या आई-वडील आणि भावांना संशय होता. शनिवारी (ता. १६) सकाळी राक्षा शिवारात शमीम शाह कासम शाह (वय 30 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) हे आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी तिथे अचानक चंद्रकला बावस्कर धावत आल्या. प्रचंड घाबरलेल्या चंद्रकला यांनी ‘माझे भाऊ आणि आई वडील प्रेमसंबंधांच्या कारणावरून माझा जीव घेणार आहे. त्यामुळे, मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी त्यांनी शमीम यांच्याकडे विनवणी केली. त्यामुळे शमीम यांनी तिला त्यांच्या बकऱ्याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले.

चंद्रकला यांचे भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर हे काही वेळात तिथे तिथे धावतच आले. त्यांच्या हातात कुऱ्हाड होती. त्यांनी शेडमध्ये पाहणी करून अखेर चंद्रकला यांचा शोध घेऊन मारहाण सुरु केली. तसेच हातात असलेल्या कुऱ्हाडीने चंद्रकला यांच्या डोक्यात घाव घातले. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी तिथे चंद्रकलाबाई यांचे आई वडिल देखील आले. त्यांनी शमीम याना मारहाण करत दोन्ही मुलांना चंद्रकलाला जिवंत ठेऊ नका असे सांगितले. शमीम याने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत थेट पोलीस ठाण्यात पोहचले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

बावस्कर भावांच्या तावडीतून सुटलेले शमीम सुरवातीला थेट पहूर पोलिस ठाण्यात पोहचले. यावेळी त्यांनी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र, घटनास्थळ फर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पहूर पोलिसांनी तत्काळ घटनेची माहिती फर्दापूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच, फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. तर, सिल्लोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेम आणि धमकी! FB लाइव्ह करत युवकाने मारली नदीत उडी अन्…

प्रेमी युगुलाने आत्महत्येसाठी निवडली हॉटेलमधील रूम नंबर 305ची खोली…

'प्रेम करताना जात धर्म बघू नका,' असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

धक्कादायक! प्रेमसंबंधातून नवऱ्यासह तीन मुलांची हत्या…

प्रेमात अडसर ठरत असल्याने चिमुकल्याचा खून करून मृतदेह अक्षरशः फेकला…

The post सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka