Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समृद्धी महामार्गावर बाजूला काम करत असलेल्या 6 महिलांना ट्रकने चिरडलं.

समृद्धी महामार्गावर बाजूला काम करत असलेल्या 6 महिलांना ट्रकने चिरडलं.

जालना : समृद्धी महामार्गावर एक भरधाव ट्रकने मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहे.

समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची शिवारात ही घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर महिला मजूर या मार्गाच्या बाजूला काम करत होत्या. त्याचवेळी एका भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडले. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रक नागपूरवरून मुंबईच्या दिशेने येत होता. ट्रकने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडून पुढे केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला मजूर महिलांच्या मृतदेह पडलेले होते. हे दृश्य पाहून उपस्थितीत हादरले. अपघातानंतर स्थानिकांनी देखील मदतकार्य सुरू केलं आहे. काही जखमी महिला मजुरांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka