Dailyhunt
सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य.

सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य.

सांगली : सासरच्या छळाला कंटाळून युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इस्लामपूर येथे घडली आहे. विशेष म्हणजे तिचा प्रेमविवाह झाला होता. सासूच्या औषधोपचारासाठी माहेरहून 2 लाख रुपये आणण्यासाठी नवविवाहिता अमृता ऋषिकेश गुरव हिचा छळ करण्यात येत होता.

या त्रासाला कंटाळून तिने शुक्रवारी विषारी द्रव प्राशन केले आणि रविवारी (ता. ५) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हुंडाबळीच्या या प्रकरणी अमृताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिचा पती आणि सासरच्या लोकांसह एकूण पाच जणांवर इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृताची आई वंदना कोले यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, अमृता आणि ऋषिकेश अनिल गुरव यांचा 26 डिसेंबर 2024 रोजी प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच पती ऋषिकेश आणि सासरचे लोक सासू अनुपमा यांच्या आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी अमृताकडे माहेरहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत होते.

सासरकडून होणाऱ्या या मागणीसाठी तिला वारंवार मारहाण करून मानसिक त्रास दिला जात होता. पती ऋषिकेशकडून शारीरिक मारहाण होत असे, तर सासू अनुपमा आणि नणंद ऋतुजा या दोघी तिचा सतत अपमान करत होत्या. मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव (रा. वडणगे, जि. कोल्हापूर) हा पती ऋषिकेशला ‘तू अमृताला सोडून दे, मी तुझं आपल्याच जातीतील मुलीशी लग्न लावून देतो,’ असे सांगून अमृताचा मानसिक छळ करत होता.

अमृता यांनी छळाला कंटाळून विषारी द्रव प्राशन केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिला तातडीने इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, जिथे रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या आई-वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली असता, तिने घडलेला सर्व प्रकार त्यांच्यासमोर सांगितला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पती ऋषिकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरा अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव आणि मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

नवविवाहित युवतीला म्हणाले, तू तुझ्या बापाकडून 20 लाख रुपये घेऊन ये…

सांगली! 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने दरोडा टाकणाऱ्या टोळीचा लावला छडा…

The post सांगली! प्रेमविवाह झालेल्या युवतीने संपवलं आयुष्य… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka