Dailyhunt
संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट.

संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट.

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका संतापलेल्या पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला करून कापल्याची धक्कादायक घटना रतलाम शहरातील त्रिवेणी रोड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पत्नीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित पती हा व्यवसायाने मेकॅनिक आहे. पत्नी आपले ऐकत नसल्याचा आरोप पतीने केला आहे. ती सकाळपासून रात्रीपर्यंत बाहेर फिरत असते, असे पती म्हणाला. घरी आल्यानंतरही ती सतत इतर मुलांशी फोनवर बोलत असते. तिला हे करण्यापासून थांबवले की वाद घालायला सुरवात करायची. पत्नी गुरुवारी रात्रीही उशिरा घरी पोहोचली आणि अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलू लागली. याबाबत पत्नीला विचारणा केल्यानंतर संतापली. सकाळी तिने झोपेत असतानाच धारदार शस्त्राने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.

दरम्यान, रक्तबंबाळ झालेल्या पतीला आई-वडील आणि बहिणीने रतलामच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोघांचे 2020 मध्ये लग्न झाले असून, त्यांनी दलालाला पैसे देऊन वधू आणली होती. 2 वर्ष सर्व काही सुरळीत चाललं, पण गेल्या 2 वर्षांपासून पत्नीचे घरात वाद होऊ लागले. ती सकाळी बाहेर पडू लागली आणि संध्याकाळी उशिरा घरी यायला लागली. विचारणा केल्यानंतर ती पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करायची. या सर्व प्रकाराला मुलगा कंटाळला होता.

गंमत! मित्रांनी भरली प्रायव्हेट पार्टमध्ये हवा अन् क्षणातच…

हॉटेलमध्ये ग्राहकाच्या प्रायव्हेट पार्टला चावला विंचू तब्बल चार वेळा…

प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…

संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची 'अग्निपरीक्षा', प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…

डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…

The post संतापजनक! पत्नीने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka