Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू.

सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू.

कोल्हापूर: शाळेतून घरी येत असताना सापावर पाय पडल्यामुळे चिमुकला घाबरून आजारी पडला होता. ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाकरे (ता. करवीर) येथे रविवारी (ता.

17) सायंकाळी घडली आहे. अर्णव नवनाथ चौगुले (वय 8) असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इंग्रजी माध्यमात शिकत असलेला अर्णव चार दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत होता. यावेळी त्याचा सापावर पाय पडला होता. त्यामुळे घाबरलेल्या अर्णवने घरी आल्यानंतर आई वडिलांनी वाटेत झालेला प्रकार सांगितला. आई वडिलांनी तातडीने पाहिले असता त्याच्या पायावर कोणत्याही प्रकारचा ओरखडा किंवा दंश दिसला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची मनातील भिती दूर झाली होती. पण, अर्णव सापावर पाय पडल्याच्या भीतीने प्रचंड घाबरला होता.

अर्णव याला त्याला ताप भरला. ताप भरल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, संर्पदंशाची कोणतीही लक्षणे दिसत नाही आणि तापही कमी येत नसल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चिमुरडा अर्णव अत्यवस्थ झाला. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच रविवारी सायंकाळी त्याचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संतापजनक! बापाने चिमुकलीच्या तोंडात तंबाखू देऊन केली हत्या…

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…

हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…

हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post सापावर पाय पडल्याच्या भीतीनंतर चिमुकल्याचा घाबरुन मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka