Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम.

सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम.

सातारा: सातारा जिल्ह्यातील शिवधर गावात राहणाऱ्या विवाहितेची सोमवारी (ता. 7) राहत्या घरी गळा चिरून हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात आरोपीला पुण्यातून अटक केली होती.

अक्षय साबळे असे आरोपीचे नाव आहे.

प्रेम संबंधातून युवकाने महिलेला संपवल्याचं प्राथमिक तपसात समोर आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. प्रेम विवाह केल्यानंतर गावातीलच युवकासोबत महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. पूजा जाधव असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विवाहिता पूजा जाधव हिचा 2017 मध्ये प्रथमेश जाधव याच्याशी प्रेमविवाह झाला होता. नंतर गावातीलच युवकासोबत ठेवलेल्या अनैतिक संबंधांमधून पूजाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. मृत विवाहिता पूजा आणि आरोपी अक्षय यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. अक्षय ने तिला लग्नासाठी विचारले होते. तिच्या मुलाची जबाबदारी घेण्याची तयारी ही त्याने दर्शवली होती. पण आधीच विवाहित असलेल्या पूजाने आरोपीस लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये वाद होते. सात जुलै रोजी दुपारी पूजा घरी असल्याचे पाहून अक्षय तिच्या घरात घुसला व गळा चिरून त्याने पुजाची हत्या केली.

गावापासून एक-दीड किलोमीटर लांब असणाऱ्या पूजाच्या घरी दुपारी सगळे शेतात कामाला गेले होते. त्यामुळे वस्तीत कोणीही नव्हते. पूजाचा नवरा ही कामावर गेला होता. घरात कोणीच नसल्याचे पहात अक्षयने संधी साधली. अक्षय आणि पूजा यांच्यात लग्नावरून पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात अक्षयने चाकूने तिचा गळा चिरला व तो तिथून पळून गेला. गावातील लोकांनाही पूजा आणि अक्षयच्या प्रेम संबंधाबाबत कुणकुण होती. त्यामुळे आरोपीचे नाव समजल्यावर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आणि त्याला पुण्यातून पकडले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सातारा हादरला! विवाहित महिलेची हत्या प्रेमसंबंधातून; आरोपीला अटक…

सातारा हादरला! घरामध्ये घुसून विवाहित महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या…

वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी…

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची गळफास घेत आत्महत्या…

जीवन संपवलं! 'वेळेवर पैसे देता येत नसतील तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड…

सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…

सातारा जिल्हा हादरला! आईने चिमुकलीसह घेतली कृष्णा नदीत उडी…

सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka