Dailyhunt
सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्.

सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्.

सातारा : कॉलेजला निघालेली युवती मित्रासोबत लॉजवर जात असताना घरच्यांनी रंगेहाथ पकडले. कुटुंबियांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात युवतीचा चुलत भाऊ, दोन काका यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास कतर आहेत.

घरातून सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून बाहेर पडलेली तरुणी सकाळी-सकाळीच लॉजवर मित्रासोबत निघाली होती. मात्र, लॉजसमोरच घरातल्यांनी तिला रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिच्या मित्राला अक्षरश: त्यांनी धू-धू धुतलं. एवढेच नव्हे तर कारमध्ये घालून कास पठारावरही नेलं. या ठिकाणी एका शेतात पालथं झोपवून त्याला बेल्टने बेदम मारहाण केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात तरुणीचा चुलत भाऊ, दोन काका यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवती (वय १९) आणि तिचा मित्र उवैश नसीम अंसारी (वय २०, रा. उत्तर प्रदेश) या दोघांची पब्जी खेळत असताना ओळख झाली होती. युवती घरातून सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून बाहेर पडली होती. पण, युवती आणि उवैश हा सातारा शहरातील एका लॉजवर निघाले होते. युवतीच्या घरातल्यांना तिची शंका आल्याने त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. तिचा पाठलाग करत तिचा चुलत भाऊ, दोन काका लॉजपर्यंत पोहोचले. यावेळी युवती आणि तिचा मित्र उवैश हा लॉजमध्ये निघाले होते. तत्पूर्वीच घरातल्यांनी दोघांनाही रंगेहाथ पकडले. तिच्या मित्राला त्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर कारमध्ये घालून कास पठार परिसरात नेले. या ठिकाणी रस्त्याच्याकडेला गाडी उभी करून उवैशला एका शेतात नेले. या ठिकाणी त्याला पालथे झोपवून त्याच्या पाठीवर, पायावर बेल्टने बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर त्याला घेऊन संबंधित नातेवाईक सातारा शहर पोलिस ठाण्यात आले.

युवतीच्या फिर्यादीनुसार उवैशवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. नातेवाइकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या उवैशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. त्याच्या जबाबानुसार पोलिसांनी युवतीचा चुलत भाऊ, लहान व मोठे काका यांच्यासह अनोळखी दोघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. सध्या उवैश अंसारी हा पोलिसांच्या कोठडीत आहे. उवैश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, उत्तर प्रदेशातून तो युवतीला भेटण्यासाठी साताऱ्यात आला होता. पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांनाही या प्रकाराची माहिती दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…

प्रियकरासोबत पुण्यात पळून आलेल्या युवतीवर बलात्कार…

प्रियकराला घरी बोलावून प्रायव्हेट पार्टवर केले ब्लेडने वार…

प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेला प्रियकराला पकडले अन् विवस्त्र करून…

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…

प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

The post सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka