Dailyhunt
शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षिकेचा रोमान्स अन् पुढे.

शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षिकेचा रोमान्स अन् पुढे.

बंगळूरू (कर्नाटक): एका शाळेच्या सहलीदरम्यान दहावीचा विद्यार्थी आणि शिक्षिकेमध्ये झालेल्या रोमान्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर खळबळ उडाल्यावर शिक्षिकेला निलंबीत करण्यात आले आहे.

कर्नाटकच्या चिक्कबल्लापुर जिल्ह्यातील मुरुगमल्ला गावातील हे प्रकरण आहे. पुष्पलता असे निलंबीत करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. ती मुरुगमल्ला ग्राम सरकारी हायस्कूलमध्ये प्रिन्सिपल होती. व्हायरल फोटोमध्ये विद्यार्थी प्रथम शिक्षिकेचा पदर ओढतो, मिठी मारतो आणि पुढे किस करताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये विद्यार्थ्याने शिक्षिकेला उचलून घेतले आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याने हे फोटोशूट केले आहे.

दरम्यान, विद्यार्थी आणि शिक्षिकेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी संताप व्यक्त केला. गुरु शिष्याच्या पवित्र नात्याची बदनामी सुरु झाल्याची टीका झाली. रोमँटिक फोटोशूटचे फोटो समोर आल्यानंतर विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे. त्यांनी या फोटोंवर नाराजी व्यक्त केली. याची तक्रार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. तक्रार दाखल झाल्यानंतर बीईओ वी उमा देवी यांनी शाळेचा दौरा केला व चौकशीनंतर प्रिन्सिपलला निलंबित केले. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Video : शाळेतच दोघींनी ओढल्या एकमेकींच्या झिंज्या…

विद्यार्थ्याचे शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध अन् शिक्षिकेची दुसऱ्यासोबत…

शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…

विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…

The post शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षिकेचा रोमान्स अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka