Dailyhunt
शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट.

शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट.

खनौ (उत्तर प्रदेश) : दोघांचे शाळेत असल्यापासूनच प्रेमसंबंध होते. दोघांनी प्रेमविवाह केला पण लग्नानंतर नोकरी मिळत नसल्याने पतीने प्रथम गळफास घेत आत्महत्या केली. माहेरी असलेल्या पत्नीला याबाबत माहिती मिळताच तिने बिल्डिंगवरुन उडी घेत आयुष्य संपवले.

पतीने वाराणसीच्या सारनाथ येथील होमस्टे गेस्ट हाऊसमध्ये तर पत्नीने माहेरी गोरखपूरमध्ये आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

मृत हरीश (वय २८) हा बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील रहिवासी होता. वाराणसीत राहणारा हरीशचा नातेवाईक राजू कुमार होमस्टे गेस्ट हाऊसवर पोहोचल्यावर पोलिसांना याची माहिती मिळाली. बराच वेळ दार ठोठावूनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी होमस्टे गेस्ट हाऊसच्या ऑपरेटरला माहिती दिली. ऑपरेटरने आत डोकावून पाहिले असता हरीश लटकलेला दिसल्याचे पाहून धक्का बसला. याबाबतची माहिती पोलिसांना दिली. सारनाथ पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यासाठी पाठवला.

'Crime Reporting' Online अभ्यासक्रम अन् 'कमवा आणि शिका'ची संधी!

हरीशचे सासरे रामचरण श्रीवास्तव यांनी सांगितलं की, हरीश हा अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. त्यामुळे तो तणावात होता आणि त्याला अंमली पदार्थांचं व्यसनही लागले होते. दुसरीकडे, हरीशच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नी संचिता (वय २८) हिनेही घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. हरीशने एमबीएचं शिक्षण घेतले होते आणि शिक्षणानंतर हरीश मुंबईतील एका खासगी बँकेत नोकरी करत होता.

पत्नी संचिता हिची प्रकृती ठीक नसल्याने त्यानी नोकरी सोडली आणि गोरखपूरमध्ये सासरच्यांसोबत राहू लागला. तो गोरखपूरहून पाटणा येथील त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. पण वाराणसीमधील सारनाथ येथील अटल नगर कॉलनी येथील होमस्टेवर थांबला आणि तिथेच त्याने गळफास लावून आत्महत्या केली. दोघांचे लग्न 2 वर्षांपूर्वीच झाले होते. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…

वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…

The post शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka