Dailyhunt
शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच केला बलात्कार; शिवाय.

शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच केला बलात्कार; शिवाय.

त्रपती संभाजीनगर: डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या शासकीय ठेकेदाराने पतीपासून विभक्त झालेल्या 26 वर्षीय महिलेवर ऑफिसमध्येच बलात्कार केला. ठेकेदाराने संबंधित महिलेचे अश्लिल व्हिडीओ-फोटो काढून पुढे ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला.

पीडित महिलेने अमोल विठ्ठल पाटील (वय 40 वर्ष, रा. टाऊन सेंटर, सिडको) याच्याच विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, नवऱ्यासोबत वाद झाल्याने एप्रिल 2022 पासून ती त्याच्यापासून विभक्त एकटीच शहरात राहत आहे. एका खाजगी शिकवणी येथे शिक्षिका म्हणून ती काम करते. एका डेटिंग ॲपवर खाते उघडले होते. त्यावेळी तिची अमोल पाटील याच्याशी ओळख झाली. तसेच तुझा बायोडाटा घेऊन माझ्या ऑफिसला ये असे पाटीलने सांगितले. पीडिता बायोडेटा घेऊन त्याच्या ऑफिसला गेली. तेव्हा त्याने माझी पत्नी मला सोडून नाशिकला राहते. मी सध्या आई वडील आणि भावासोबत राहतो. तू मला खूप आवडली असून आपण काही दिवसांनंतर लग्न करू असे म्हटला. तेव्हा तिने त्याला लग्नास नकार दिला. तेव्हा अमोलने तिच्यावर ऑफिसमध्येच बलात्कार करून तिचे फोटो आणि व्हिडीओ तयार केले. कोणाला काही सांगितले तर जगू देणार नाही अशी धमकी दिली. त्याच्या धाकाने तिने पोलिसात तक्रार दिली नव्हती.

महिलेचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पाटील तिच्यावर वारंवार अत्याचार केला. अत्याचाराला कंटाळून अखेर महिलेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठून 12 जानेवारीला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विवाहीत युवकावर तिघांनी शेतामध्ये केला सामुहिक बलात्कार…

पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…

विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणारे तिघे अखेर अटकेत…

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…

The post शासकीय ठेकेदाराचा महिलेवर ऑफिसमध्येच केला बलात्कार; शिवाय… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka