Dailyhunt
शिक्षक नवरा नवविवाहीत पत्नीला हसायला सांगायचा अन् फोटो काढायचा.

शिक्षक नवरा नवविवाहीत पत्नीला हसायला सांगायचा अन् फोटो काढायचा.

खनौ (उत्तर प्रदेश): ठाकूरगंज परिसरातील नवविवाहित प्रिया दीक्षित हिच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. पदवीधर आणि चार वेळा टीईटी उत्तीर्ण झालेल्या प्रियाला नुकतीच सरकारी नोकरी मिळाली होती.

नोकरीवर हजर होण्यापूर्वीच तिने आत्महत्या केली. प्रियाने दोन पानांची सुसाईड नोट लिहिली असून ज्यामध्ये तिने तिचा पती शुभम आणि सासरच्या लोकांवर छळ आणि हत्येचा प्रयत्न असे गंभीर आरोप केले आहेत.

प्रियाच्या वडिलांनी सांगितले की, ‘प्रियाचा विवाह 10 डिसेंबर 2024 रोजी ठाकूरगंज येथील रहिवासी शुभम टंडन याच्या सोबत झाला होता, जो बाराबंकी येथील फतेह सराय प्राथमिक शाळेत शिक्षिक आहे. लग्नानंतर काही दिवसांनी सासू गीता टंडन, सासरे गिरधर नारायण टंडन आणि मेहुणी नेहा, प्रियांका आणि सोनी यांनी कमी हुंडा आणल्याबद्दल तिला टोमणे मारण्यास सुरुवात केली. प्रकरण हळूहळू मारहाण आणि मानसिक छळापर्यंत पोहोचले. 3 फेब्रुवारी रोजी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्यांनी प्रियाला घराबाहेर हाकलून लावले. ती सहा तास घराबाहेर उभी राहून आत जाण्याची विनंती करत होती. तिने 112 वर फोन करून पोलिसांना फोन केला तेव्हाच तिला आत प्रवेश मिळाला. त्यानंतर तिला काही ना काही बहाण्याने तिच्या माहेरी पाठवण्यात आले. शुभम प्रियाला मारहाण करायचा आणि नंतर तिला हसायला सांगायचा. तो जबरदस्तीने तिचे फोटो काढायचा आणि तिचे मानसिक खच्चीकरण करायचा.’

सुसाईड नोटमध्ये प्रियाने लिहिले आहे की, ‘लग्नापासून तिचे आयुष्य खूप वेदनादायक झाले आहे. 1 फेब्रुवारी रोजी तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी उशाने गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने डायल 112 वर देखील फोन केला होता, परंतु कोणतीही मदत मिळाली नाही. डीएम, पोलिस आयुक्त आणि महिला आयोगाकडे तक्रार केली. तिला सर्वत्र उत्तर मिळाले की जर नवऱ्याला तिला ठेवायचे नसेल तर संबंध संपवा.’

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे, पोलिस सोशल मीडियावर दावा करत आहेत की आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच वेळी, एसीपी स्वतः म्हणत आहेत की अद्याप अटक झालेली नाही. या विरोधाभासामुळे प्रकरण अधिक संशयास्पद बनले आहे. प्रियाचे कुटुंब आता न्यायाची मागणी करत आहे आणि दोषींना अटक करण्याची मागणी करत आहे.

धुळे! जवानाने केली पत्नीची निर्घृण हत्या…

लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…

महाराष्ट्राचा सुपुत्राची शौर्यगाथा! मांडीत गोळ्या घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले…

हृदयद्रावक! बापाने वाढदिवशी दिला वैष्णवीच्या चितेला अग्नी…

The post शिक्षक नवरा नवविवाहीत पत्नीला हसायला सांगायचा अन् फोटो काढायचा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka