Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्षक वर्गातच मोबाईलवर पाहता होता अश्लील व्हिडीओ; विद्यार्थ्याने पाहिलं अन्.

शिक्षक वर्गातच मोबाईलवर पाहता होता अश्लील व्हिडीओ; विद्यार्थ्याने पाहिलं अन्.

खनौ (उत्तर प्रदेश): झांसी येथील एका शाळेत शिक्षक वर्गामध्ये बसूनच अश्लिल व्हिडीओ पाहत होता. विद्यार्थ्याने संबंधित दृष्य पाहिल्यानंतर जोरात हसू लागला होता. यामुळे शिक्षक चिडला आणि विद्यार्थी जखमी होईपर्यंत त्याला जबर मारहाण केली.

मुलाला मारहाण झाल्याचं समजल्यानंतर त्याच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कुलदीप यादव या शिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कुलदीप यादव हा शिक्षक वर्गात बसून अश्लिल व्हिडीओ पाहत होता. यामुळे एक विद्यार्थी आणि त्याचे वर्गमित्र जोरजोरात हसू लागले होते. यामुळे कुलदीप यादव चिडला आणि त्याने विद्यार्थ्याच्या केसाला धरुन उभे केले. विद्यार्थ्याचं डोकं भिंतीवर जोरात आदळले आणि मारहाण केली. घरी गेल्यानंतर विद्यार्थ्याने याबाबतची माहिती पालकांना दिली होती.

विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, “विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेमुळे कुलदीप यादवचा संताप झाला. त्याने माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली. माझा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या कानालाही जखम झाली आहे. मी याप्रकरणी शिक्षका विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे”.

मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शिक्षक कुलदीप यादवला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक (ग्रामीण) गोपीनाथ सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही शिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.’

मुख्याध्यापकाने केली शिक्षिकीकडे शरीर सुखाची मागणी…

ठाणे हादरले! शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण अन् रेकॉर्डिंग…

विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा…

धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून…

शिक्षकाकडून विद्यार्थीनीवर अत्याचार, बेशुद्ध पडताच घटना उघड…

The post शिक्षक वर्गातच मोबाईलवर पाहता होता अश्लील व्हिडीओ; विद्यार्थ्याने पाहिलं अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka